Ad will apear here
Next
नंदुरबारमध्ये ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
नंदुरबार : शासनाचे ग्रंथालय संचालनालय व नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे जुने पोलिस कवायत मैदान येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी दीपप्रज्वलनाने केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी भूषविले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, प्रभारी नगराध्यक्ष परवेज खान, नगरपालिकेच्या माजी उपनगरध्यक्षा डॉ. शोभा मोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे, उद्योगपती मनोज रघुवंशी, जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, पत्रकार रमाकांत पाटील, सूर्यभान राजपूत, योगेंद्र दोरकर, राजेंद्र गावीत, साहित्यिक निंबाजी बागुल, नगरसेवक कुणाल वसावे, रवींद्र पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथालयांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये लोकमान्य टिळक वाचनालय (नंदुरबार), महात्मा गांधी पुस्तकालय (नवापूर), नुराणी सार्वजनिक वाचनालय (शहादा), बाजीराव खतऱ्या तडवी सार्वजनिक वाचनालय व डी. आर. शाळेच्या पथकाचाही या वेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी हेमलता पाटील यांनी लिहिलेल्या ‘असेलही नसेलही’ या मराठी गजल पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी विद्यालयातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी ग्रंथांनी सजवलेल्या ग्रंथदिंडीचे उपनगराध्यक्षा शोभा मोरे, नगराध्यक्ष परवेज खान व जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी ग्रंथ पूजन करून दिंडीस शुभारंभ केला. ही दिंडी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी व नगराध्यक्ष परवेज खान यांनी खांद्यावर घेऊन टाळ- मृदंगाच्या गजरात कार्यक्रमस्थळी आणली. या दिंडीत सर्व मान्यवर सहभागी झाले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZVJBW
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
मिशन हायस्कूलमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा नंदुरबार : येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
आवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे गंगाराम जानू आवारी गुरुजी. ते केवळ शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर त्यांच्यात एक संशोधक, सूक्ष्म निरीक्षक, अभ्यासक व साहित्यिकदेखील दडलेला होता. अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आवारी गुरुजींच्या जन्मशताब्दीची सांगता पाच जुलै २०१९ रोजी झाली
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language